राज्याच्या प्रगतीसाठी लोकहिताचे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 नवी दिल्ली  :  समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. राज्याच्या उत्कर्षासाठी शासनाने लोकहिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी बुधवारी20 जुलै 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाबाबत होणाऱ्या सुनावणी संदर्भात वकीलविधीज्ञ आणि तज्ज्ञांची भेट घेऊन सखोल चर्चा केली. तसेचलोकसभेत गटनेते व पक्ष प्रतोद बदलण्यासंदर्भात आज झालेल्या निर्णयाविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार राहूल शेवाळेडॉ.श्रीकांत शिंदेहेमंत गोडसेसदाशिवराव लोखंडेकृपाल तुमानेभावना गवळीप्रतापराव जाधवसंजय मंडलीकधैर्यशील मानेहेमंत पाटीलश्रीरंग बारणेराजेंद्र गावीत  उपस्थित होते.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेजनहिताचे निर्णय घेऊन सर्वसामान्य जनताशेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्य करीत आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णयपेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे 5 आणि 3 रूपयांनी कमी करण्याचा निर्णयशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीचे निर्णयअधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचा तसेच प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय असे काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र-राज्याच्या सहकार्याने कार्य करण्याची आवश्यकता आहे. राज्याला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार महत्वाचे निर्णय व त्यांची अंमलबजावणी करीत असून केंद्र शासनाचेही महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी अधोरेखित केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Governor Koshyari pats Maha NCC cadets for winning Inter Directorate Shooting Championships

Wed Jul 20 , 2022
Mumbai –  Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari patted the contingent of Maharashtra NCC for winning the Inter Directorate Sports Shooting Championships 2022 during a reception held at Raj Bhavan Mumbai on Tue (19 July).              The Governor complimented the NCC Maharashtra Directorate shooting team for winning the Championships for the second consecutive year. He presented a memento and the book ‘Wings of Fire’ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com