मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
बकरी ईद हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा सण साजरा करताना उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा अतिशय व्यापक विचार केला आहे. हा विचार सार्वकालिक, प्रासंगिक आहे. बकरी ईदनिमित्त मी राज्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लीम बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.