संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
कन्हान : – पावसाळा सुरू झाला परंतु पाऊस तर येत नसुन जोरांचा वादळ वारा सुटुन साटक येथील शेता तील विहीरी च्या सोलर पंप व प्लेटा उडुन शेतकरी डुलीचंद भुते यांचे चांगलेच नुकसान झाले आहे.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
मंगळवार (दि.१४) जुन ला रात्री आलेल्या जोरा च्या वादळ वा-याने साटक येथील शेतकरी डुलीचंद सदाशिव भुते यांच्या शेतातील विहीरीत लावलेला सोलर पंप च्या प्लेटा वादळामुळे उडुन गेल्या आणि त्या प्लेटा तुट फुट होऊन सर्व सोलर पंप चे कनेक्शन तुटून जवळपास शेतकरी डुलीचंद भुते यांचे ६० ते ७० हजार रूपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.