कामठी तालुक्यातील ९१.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– तालुक्यात पुन्हा मुलांपेक्षा मुली सरस

कामठी :- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. कामठी तालुक्याचा बारावीचा निकाल ९१.३० टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातील फक्त ६ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शतप्रतिशत लागला असून तालुक्यात पुन्हा मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत.

तालुक्यातून २२४४ मुले व १८३७ मुली असे एकूण ४ हजार ८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी २००६ मुले व १७२० मुली असे एकूण ३ हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.३९ एवढी आहे. तर ९३.६३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ९१.३० टक्के एवढा लागला आहे. यात ४६५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, १२७१ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर १४७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ५१२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. मागील वर्षी ३ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शतप्रतिशत लागला होता यावर्षी मात्र ६ महाविद्यालयांनी शंभरी गाठली आहे. यात रामकृष्ण शारदा मिशन ज्यू कॉलेज कामठी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी, श्री जयंतराव वंजारी कनिष्ठ महा. वडोदा, इंडियन ऑलिम्पियाड कनिष्ठ महा. भिलगाव, भोसला मिलिटरी स्कूल पंचवटी कोराडी व सनराइस कॉन्व्हेन्ट महादुला यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर एम एम रब्बानी ज्यू कॉलेज कामठी (९६.५५), एस. के. पोरवाल ज्यू कॉलेज कामठी (७६.८९), एस आर लोईया ज्यू कॉलेज कामठी (८५), नूतन सरस्वती गर्ल्स ज्यू कॉलेज कामठी (५५.८१), नूतन सरस्वती बॉईज कनिष्ठ महाविद्यालय कामठी (४०), मास्टर नूर मो. उर्दू कनिष्ठ महा. कामठी (४१.६६), स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल कामठी (९५.९१), विद्या मंदीर ज्यू कॉलेज कोराडी (९३.४३), तेजस्विनी ज्यू कॉलेज कोराडी (९६.३८), आर्टस, कॉमर्स व सायन्स ज्यू कॉलेज कोराडी (९८.११), तुळजा भवानी ज्यू कॉलेज गुमथळा (९९.२७), सरस्वती ज्यू कॉलेज न्यू पांजरा कोराडी(९८.८५) सौरभ चांभारे कनिष्ठ महा. टेमसना (९६.८७), स्व. झेड. बाविस्कर कनिष्ठ महा. पावनगाव (६५.६२), प्रागतिक कनिष्ठ महा. कोराडी(९२.८१), श्री गणपती ज्यू.कॉलेज शिरपूर (६६.६६), प्रियांती ज्यू कॉलेज तरोडी (९४.७३), मंडळ आर्टस, कॉमर्स व सायन्स ज्यू कॉलेज चिखली (७५), परशुराम औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी (५०), रब्बानी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी (६६.६६) टक्के लागला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आर टी ई प्रवेशासाठी 31 मे पर्यंत मुदत - गटशिक्षणअधिकारी संगीता तभाणे

Tue May 21 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यतीत शाळा, विना अनुदानित शाळा मध्ये आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी पालकांनी 31 मे 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन कामठी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे यांनी केले आहे. @ फाईल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!