भर उन्हाळ्यात मुस्लिम समाज धरताहेत रमजानचे उपवास

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
-शांतीचा संदेश देणारा रमजान सुरू
-मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये उत्साह,फेरूमल चौकात थाटली विविध दुकाने
कामठी :- मुस्लिम समुदायाच्या पवित्र रमजान महिन्याला 24 मार्च पासून सुरुवात झाली आहे.’रमजान ‘च्या या महिन्यात आपल्या अनुयायांवर अल्लाहची खूप मोठी कृपादृष्टी असते.या रमजान महिन्याला ‘बरकती’चा महिना असा सुद्धा संबोधील्या जाते.मनामनातिल दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव , सदभाव वाढवित संयम, त्याग, शांती, सहिष्णुता,चांगुलपणा , प्रामाणिकपणा अशा मानवतेच्या श्रेष्ठ गुणांचे आदर्श निर्माण करणारा हा रमजान महिना असून या पवित्र महिन्याचे श्रद्धेय महत्व जपून येथील मुस्लिम समाजाच्या अनुयायांनी या मार्च महिन्याच्या भर उन्हाळ्यात उपवास धरले आहेत एकीकडे या लखलखत्या उन्हात नागरिकांना वारंवार तहान लागते मात्र या वातावरणात हे मुस्लिम बांधव सहरिपासून ते इफ्तार पर्यंत निव्वळ अन्न पाण्यापासून दूर राहून काही न पिता व काही न खाता पंधरा तासाचा उपवास करीत आहेत. तर हे उपवास मुस्लिम बांधवांसाठी श्रद्धेच्या भावनेतून एक कसोटीच ठरत आहेत.रमजान महिन्या निमित्त मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तर फेरूमल चौकात लागलेले विविध खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत.रमजान महिन्याची सुरुवात 23 मार्च रोजी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर करण्यात आली त्यामुळे अनेक मुस्लिम बांधवांनी आपल्या नातेवाईकांना व मित्र परिवाराला शुभेच्छा दिल्या आहेत.या रमजान महिन्यात फेरूमल चौकाला वेगळेच रूप येते.या ठिकाणी विविध फळ,सुका मेवा व धार्मिक ग्रंथ,तसेच कापड विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली जात आहे.तसेच शहरातील विविध मशिदासमोर जिलेटीन व विद्दुत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह येथे दररोज इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे तर या इफ्तार कार्यक्रमात दररोज भाविकांचा सहभाग असतो.
मुस्लिम बांधव या रमजान च्या पवित्र महीन्यात सकाळी फजर नमाज, दुपारी जोहर नमाज आणि शेवटी ईशाची नमाज पठण करून 30 दिवस कुरांणचे पठण करतात, या महिन्यात तरावीची नमाज नमाज पठनाला खूप महत्व असते.यावेळी वर्षभरात अडीच टक्के जकात काढुन गोर गरिबांना वाटप करतात.पवित्र रमजान महिन्यात अनाथ, विधवा महिला व गरजूंना दानधर्म करून पुण्याचे कार्य पार पाडतात.
बॉक्स:-सहेरी व इफ्तार मध्ये असतो 15 तासांचा अवधी
-रमजान मध्ये रोजेदार बांधव सूर्योदय पूर्वी सहेरी करून पूर्ण दिवस अन्न व पाण्याविना राहून अल्लाहची ईबादत करतात आणि सुर्यास्ता वेळी अल्लाहच्या साक्षीने पेंनखजुरीने रोजा(उपवास )सोडतात.हा सहेरी आणि इफ्तार चा कालावधी जवळपास 15 तासांचा असतो त्यामुळे कडक उन्हातही रोजेदार बांधवांना श्रद्धेपोटी चालना मिळते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com