वर्षभरात दिले 84 हजारावर नवीन वीज जोड…

नागपूर :- नागपूर आणि वर्धा शहरांसह महावितरणच्या नागपूर परिमंडलात गेल्या वर्षभरात (2023) सर्व वर्गवारीत 84 हजार 237 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यापैकी तब्बल 62 हजार 863 घरगुती आणि 7 हजार 203 कृषी जोडण्यांचा समावेश आहे.

ऊर्जामंत्र्यांनी दिली ‘ऊर्जा’

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी ग्राहकसेवा गतिमान करण्यासाठी नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. ‘महावितरण’चे अध्यक्ष आणि संचालक व्यवस्थापकीय लोकेश चंद्र यांनीही नवीन वीजजोडण्यांचा वेग वाढविण्याचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या नागपूरचे परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात ‘इज ऑफ़ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत. महावितरण’च्या नागपूर परिमंडलामध्ये दर वर्षी साठ ते सत्तर हजार वीजजोडण्या दिल्या गेल्या, मागिल वर्षी जानेवारीपासून नवीन वीजजोडण्या देण्याच्या कामाला नियोजनपूर्वक वेग देण्यात आल्या असून 2023 मध्ये तब्बल 84 हजार 237 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

नियमित आढावा

नव्या जोडण्यांसाठी आवश्यक वीजमीटरचा तत्काळ पुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके नियमितपणे विभागनिहाय आढावा घेतात. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढला आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत 84 हजार 237 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या.

दरमहा सरासरी 7 हजारावर जोडण्या

नागपूर परिमंडल’ अंतर्गत यापूर्वी दरमहा 5 ते 6 हजार नवीन वीजजोडण्या देण्यात येत होत्या. हा वेग गेल्या वर्षी (2023) दरमहा सरासरी 7 हजारावर वर गेला.

गेल्या वर्षी 84 हजारांहून अधिक नवीन वीजजोडण्या देण्याची नागपूर परिमंडलाची कामगिरी आनंददायी आणि समाधान देणारी आहे. हा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृती मानकांप्रमाणे निश्चित कालावधीत वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी सर्व अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी कटिबद्ध असल्याची ग्वाही नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मकर संक्रांति पर बच्चों में खुशियां बांटी

Sun Jan 14 , 2024
नागपुर :- जनजागरण सेवा समिति की ओर से बजेरिया चौक, संतरा मार्केट रोड स्थित(कुंडले वाडी) में मकर संक्रान्ति के पूर्व संध्या पर बच्चों में खुशियां बांटी गई एवं बच्चों को तिल-गुड़ के लड्डू व पतंग देकर संदेश दिया कि वह प्लास्टिक पतंग एवं नायलॉन मांजे का उपयोग ना करने कि जानकारी दी. इस अवसर पर समाजसेवी दिनेश (पापा) यादव, लक्ष्मीनारायण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com