संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज 5 नोव्हेंबर ला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत संपन्न झालेल्या कामठी तालुक्यातील बाबूलखेडा, वारेगाव,कवठा, नेरी, उमरी,गारला,चकना,नान्हा मांगली,वरंभा, चिखली या 10 ग्रामपंचायतीच्या 10 सरपंच व 31 प्रभाग सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीएकूण झालेल्या मतदानाची टक्केवारी 81 टक्के झाल्याचे सांगण्यात आले असून उद्या 6 नोव्हेंबर ला कामठी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार नसून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
या 10 ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीत 10 सरपंच पदासाठी 31 उमेदवार तर 31 प्रभागातील 184 सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 16 हजार 927 मतदारांपैकी 81 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.