कामठी तालुक्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 80 टक्के मतदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आज 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत कामठी तालुक्यातील दोन मतदान केंद्रावर झालेल्या विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कामठी तालुक्यात 80 टक्के मतदान झाले असून कामठी तालुक्यातील एकूण 507 मतदारांपैकी 454 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कामठी तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 20 कामठी तहसील कार्यालय येथे 422 मतदार होते त्यापैकी 377 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच मतदान केंद्र क्रमांक 15 कोराडी विद्या मंदिर मतदान केंद्रावर एकूण 85 मतदार पैकी 77 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . मतदारासाठी सकाळपासूनच दुपारी चारवाजेपर्यंत मतदारांना मतदानासाठी लांब रांगा लावल्या होत्या तर मतदारांना सोयीचे व्हावे यासाठी कांग्रेस ,भाजप तसेच आम आदमी पार्टी तर्फे मतदान केंद्राबाहेर कामठी नगर परिषदच्या कडेला बूथ लावण्यात आले होते. याप्रसंगी कांग्रेसचे सुरेश भोयर ,प्रा अवंतिका लेकुरवाडे,कृष्णा यादव,काशिनाथ प्रधान, प्रमोद मांनवटकर,नीरज यादव,आबीद ताजी,मो सुलतान ,तुषार दावाणी,मनोज यादव आदीनी बूथ मध्ये उपस्थिती दर्शवली होती तसेच भाजप तर्फे अनिल निधान,टेकचंद सावरकर,उमेश रडके,संजू कनोजिया, लालू यादव, लाला खंडेलवाल, उज्वल रायबोले, जितेंद्र खोब्रागडे आदींनी उपस्थिती दर्शवली होती.तालुक्यात 80 टक्के मतदान झाले असून मतदान केंद्रावर पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर यांच्या नेतृत्वात विशेष चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथि समारोह

Mon Jan 30 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सर्वांना सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त आज 30 जानेवारी ला सकाळी 9 वाजता गांधी भवन, कामठी येथे “फाॅंडेशन फाॅर यु” च्या वतीने राजघाट ( बापूंच्या समाधि प्रतिकृती ) वर सामूहिक अभिवादन वाहण्यात आले तसेच सामूहिक सर्वधर्म प्रार्थना ( सेवाग्राम आश्रम ची ) करून राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com