मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दुग्धजन्य पदार्थ, केळी तसेच इतर नाशवंत पदार्थांचे शीत यंत्राव्दारे साठवणुक तसेच वाहतूक करणाऱ्या सर्वोंत्तम उद्योग संस्थांपैकी निवडक संस्थांना ७ वे सीआयआय कोल्ड चेन पुरस्कार मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई, भारतीय शाश्वत विकास संस्थेचे महासंचालक डॉ श्रीकांत पाणिग्रही, ब्लू स्टार लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी त्यागराजन, राष्ट्रीय शीत साखळी विकास केंद्राचे मुख्य सल्लागार पवनक्ष कोहली आदी यावेळी उपस्थित होते.
कोल्ड चेन पुरस्कार हे कोल्ड चेन व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य आणि उत्कृष्ट योगदानासाठी वैयक्तिक किंवा संस्थांना दिले जातात. पुरस्कारांच्या माध्यमातून सर्वोत्तम पद्धतीद्वारे शाश्वत यश आणि स्पर्धात्मकतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, रिनॅक इंडिया लिमिटेड, ग्रीन व्हॅली ऍग्रो फ्रेश, कोल्डमॅन लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, आनंदा डेअरी, बनासकांठा डेअरी, अवंती फ्रोझन फूड प्रायव्हेट लिमिटेड, गुब्बा कोल्ड स्टोरेज प्रा. लि,, सेल्सिअस लॉजिस्टिक सोल्युशन्स प्रा. लि व ओटिपाय इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांना कोल्ड चैन पुरस्कार प्रदान पुरस्कार प्रदान करण्यात आले.