सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 77 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवार (ता.२७)रोजी उपद्रव शोध पथकाने 77 प्रकरणांची नोंद करून ४६ हजार ९०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून ०७ हजार 200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 1300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 23500 रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 24 प्रकरणांची नोंद करून 4800 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 06 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या ०१ प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०१ प्रकरणांची नोंद करून ५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. तसेच गोडाऊनचा कचरा खुल्या परिसरात टाकल्या प्रकरणी धरमपेठ झोन अंतर्गत आदर्श नगर वाडी येथील मे. ओम इंटरप्राईज यांच्यावर कारवाई करीत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रस्त्यालगत बांधकाम साहीत्य पसरविणे या अंतर्गत हमुमान नगर झोन येथील विधाता बिल्डर, आणि जितेंद्र वासनिक बिल्डर्स यांच्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. असे एकूण ०७ प्रकरणात ५१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Talk by Ashok Lavasa, IAS (retd.) on “Third World to Third Largest” on 2nd March

Thu Feb 29 , 2024
Nagpur :- Organised by VED Council and Chitnavis Centre, Ashok Lavasa IAS (retd.) would be delivering a talk on, “Third World to Third Largest” – Prospects & Challenges for India on Saturday, 2nd March at 6.30 pm. at Mimosa Hall, Chitnavis Centre. A career spanning 45 years, Ashok Lavasa has occupied a key constitutional position as Election Commissioner of India, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com