‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत

मुंबई :-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

राज्याच्या आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’, आरोग्य विभागाची नोकर भरती याबाबत विस्तृत माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान संपूर्ण राज्यात सुरु आहे. या अभियानाचा सर्व माता, भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे. वरिष्ठ सहायक संचालक  मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com