मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान : – बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे ७४ वा प्रजासत्ताक दिना निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीरामजी दखने हायस्कुलच्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके, प्रमुख अतिथी केंद्र प्रमुख एल.एस.माळोदे , हायस्कुल पर्यवेक्ष क ज्ञानप्रकाश यादव, विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, शालीक ठाकरे आदि मान्यवरांचा हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन, ध्वजारोहन करुन तिरंगा झेंडा ला सलामी देत राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी, शिक्षकांनी, विद्यार्थ्यानी प्रजासत्ताक दिवसावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेच्या पटांगणात विद्यार्थांची परेड, डंबेल्स सादर करण्यात आले आणि विद्यार्थी विद्यार्थीनींनी नृत्य, डांस व पर्यावरण वर नाटक सादर करुन नागरिकांन मध्ये जन जागृती केली. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचा लन सचिन अल्ल्हडवार यांनी तर आभार प्रदर्शन बांबलकर यांनी व्यकत केले.
सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान
गुरूवार (दि.२६) जानेवारी २०२३ ला सकाळी ८ वाजता सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे ७४ वा प्रजासत्ता दिवस कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हरीभाऊ पडोळे, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नाईक, वासुदेवराव चिकटे आदि मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन, राष्ट्रीय ध्वजाचे पुजन आणि ध्वजारोहन करण्यात आले. तदनंतर संविधान प्रस्ताविकेचे वाचन व राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान गायन करण्यात आले. उपस्थित सर्वाना प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन दिनकरराव मस्के यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल श्याम बारई यांनी केले. याप्रसंगी मनोहर कोल्हे, गंगाधर अवचट, कमलसिंह यादव, मीलींद वाघधरे, पुरूषोत्तम कुंभलकर, अल्का कोल्हे, नितीन मोहणे, राहुल पारधी, अभिषेक निमजे, कृणाल कोल्हे, मनोज चिकटे, शुभम शेंडे, कृणाली कोल्हे, सुरेंद्र नेवारे आदी सभासद व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.