महापालिकेतील ७० अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान, एचडीएफसी बॅकेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न 

नागपूर :- महानगरपालिका नागपूर, एचडीएफसी बॅक आणि अर्पण ब्लड बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता. ९) रोजी नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त  राम जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांचे सहकार्य शिबीराला मिळाले. या उपक्रमाचे हे १४ वे वर्ष असुन भारतातील ११५० शहरांत असलेल्या ५५०० हुन अधिक केंद्रामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये महानगरपालिकेतील विविध अधिकारी/कर्मचारी यांनी सदर शिबीरामध्ये रक्तदान करुन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबीरामध्ये एकुण ७० अधिकारी / कर्मचारी यांचेमार्फत रक्तदान करण्यात आले. “रक्तदान हे श्रेष्ठदान ” या म्हणीप्रमाणे म.न.पा. नागपूर च्या विविध स्तरावरील लोकांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजावले. एचडीएफसी बँकेतर्फे मेहुल शिर्के, रेणुका आंबेकर व  गुरुप्रसाद राव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. ब्लड बँकेतर्फे डॉ. पी. खेडीकर, डॉ. नकुल ठाकरे व  अंकित सिंग बैस यांनी रक्तदान शिबीरात सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समृद्धी महामार्ग विशेष लेख : 1 महाराष्ट्राची भाग्यरेखा

Sat Dec 10 , 2022
नागपुर :- संपर्क, सातत्य व संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्क, सातत्य, संवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य जनता, नव उद्यमी, लहान उद्योजक, व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेकडे नेणारा राजमार्ग आहे. हा प्रकल्प आता लवकरच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com