– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. 14) रोजी उपद्रव शोध पथकाने 70 प्रकरणांची नोंद करून 42 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7 हजार 200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांचा दंड वसुली करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंग चे होर्डिंग, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन 11 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 31 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 9 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता. 14) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धंतोली अंतर्गत अभय इंटरप्राईजेस कॉटन मार्केट व गांधीबाग झोन अंतर्गत किराणा स्टोर्स जुनी मंगळवारी महाल या दोन प्रतिष्ठानांवर एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कुसुम रेसिडन्सी स्नेह नगर, मंगळवारी झोन अंतर्गत हसन बिल्डकॉन आर्या नगर कोराडी रोड रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे अंतर्गत 20 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत बालाजी इन्फ्रा टेलीकॉम नगर स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून बांधकाम साहित्य डंपिंग करून ब्लॉक केलेल्या सर्व्हिस रोडची अवज्ञा केल्याबाबत 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत विकास बालचंद्र हनुमान मंदीर मोठ्या प्रमाणात सी आणि डी कचरा रस्त्यालगतच्या परिसरात टाकलयाबाबत 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.
असे एकूण 06 प्रकरणाची नोंद करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.