कन्हान शहर विकास मंच द्वारे पुर्व पंतप्रधान वाजपेई यांची जयंती थाटात साजरी

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

कन्हान :- शहर विकास मंचद्वारे देशाचे पुर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय स्व.अटल बिहारी वाजपेई यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित कन्हान शहर विकास मंचचे नवनिर्वाचित सदस्य नरेश शेळके यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मंच मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, ताराचंद निंबाळकर यांनी अटल बिहारी वाजपेई यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमास उपस्थित सर्व मंच पदाधिका-यांनी अटल बिहारी वाजपेई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर , सचिव प्रणय बावनकुळे , भरत सावळे , प्रभाकर रुंघे, ताराचंद निंबाळकर , नरेश शेळके , अंकुश शेंडे सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mon Dec 26 , 2022
नागपूर दि. २६ : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकांना कालमर्यादा देण्यात येईल. मात्र दिलेल्या कालमर्यादेत काम पूर्ण न झाल्यास इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. मुंबईतील अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सदस्य सर्वश्री अमिन पटेल, योगेश सागर, अतुल भातखळकर, पराग अळवणी, सदा सरवणकर, यामिनी जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com