काजी व्यापार संकुल येथील ७ गाळ्यांना ठोकले टाळे, मनपा कर वसुली पथकाची मोठी कारवाई

चंद्रपूर : एकुण २१,३२,७०१/- रुपयांची थकबाकी असणाऱ्या काजी व्यापार संकुल येथील ७ गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मालमत्ता धारकाने कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने मालमत्ता धारकाचे दुकान सील केले. या ७ गाळ्यांवर मालमत्ता कर व अन्य कर थकीत आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे.कर विभागातर्फे एकुण १० गाळ्यांवर कारवाई प्रस्तावीत होती. यापैकी ३ गाळेधारकांनी आदल्या दिवशी कराचा पुर्ण भरणा केला मात्र इतर ७ गाळेधारकांनी कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने सदर कारवाई केली आहे.

यात काजी व्यापार संकुल मार्केट येथील गाळा नंबर ४ ए-१०४३ – निळकठ शामराव रघाताटे, ४ ए-१०३६-लखन.बा.साखान,४ ए-१०३५- दत्ता नामदेव ढवळे, ४ ए-१०३१- सतोष लखन सारवान,४ ए -१०३०- डि. एम. बेले, ४ ए-१०२८- रय्यत नागरी.स.प.सस्था.मर्या, ४ ए-१०२६- शकील शेख पापा शेख असे एकुण ७ गाळे सील करण्यात आले. या सर्व गाळ्यांवर एकुण २१,३२,७०१/- रुपयांची थकबाकी आहे.

सदर कारवाई २४ फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सचिन माकोडे व कर विभाग प्रमुख अनिल घुले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे,मार्केट लिपिक प्रविण हजारे ,मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अतिक्रमण विभाग कर्मचारी पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांचे विधान भवन येथे स्वागत, मानवंदना

Mon Feb 27 , 2023
मुंबई :-राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सोमवारी राज्याच्या २०२३ वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.  विधान मंडळ येथे आगमन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.   Follow us on Social Media […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com