२ आरोपीसह ७ मोटार सायकली जप्त खापरखेडा पोलीसांची कार्यवाही

खापरखेडा :-नागपुर ग्रामीण परिसरात मोटार सायकल चोरीचे घटना वाढलेली असल्याने पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार नागपुर ग्रामीण यांनी सर्व उपविभागिय पोलीस अधिकारी व सर्व ठाणेदार यांना मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास निर्देश दिले असता उपविभागिय पोलीस अधिकारी कन्हान संतोष गायकवाड व ठाणेदार खापखेडा धनाजी जळक यांनी पथक तयार करून तपास चक्र फिरवुन मोटार सायकल चोरांबाबत गोपनिय माहीती काढुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी १) कैलास हरिचंद्र तांडेकर वय ३२ वर्ष, २) आकाश हरिचंद्र तांडेकर वय ३० वर्ष दोन्ही रा. बिना संगम यांना चिखलीकला, पोलीस चौकी उमरानाला, जिल्हा छिंदवाडा (म.प्र) येथुन दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्याचा पीसीआर घेऊन छिंदवाडा, बैतुल येथुन ७ मोटार सायकली जप्त करून खापरखेडा व लगतचे पोलीस स्टेशन परिसरातील मोटर सायकल जप्त करून गुन्हे उघडकीस करण्यात आली. त्यामध्ये पोलीस स्टेशन खापरखेडा गुन्हयातील ३ मोटार सायकल व पोलीस स्टेशन कोराडी नागपुर शहर गुन्हयातील ३ मोटर सायकल व एका मोटार सायकल मालकचा शोध सुरू आहे. पो.स्टे. खापरखेडा येथील डी बी. पथकांना मोटर सायकल चोरीचा गुन्हा उघड करण्यास व ७ मोटर सायकली हस्तगत करण्यास यश प्राप्त झाले. पाहीजे आरोपी विक्की तुरकाम रा. कोराडी हा फरार असुन त्यांचा शोध सुरू आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान डॉ. संतोष गायकवाड , ठाणेदार धनाजी जळक, पोउपनि आरती नरोटे, डी. वी. पथक येथील प्रफुल राठोड, शैलेश यादव, कविता गोंडाने, मुकेश वाघाडे, राजु भोयर, राजकुमार सातुर यांचे पथकाने पार पाडली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाईफ लाईन हॉस्पिटलच्या घरफोडी प्रकरणात चौघास अटक ,मास्टरमाइंड अजूनही पसार

Tue Jun 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – तीन लाखाचा मुद्देमाल जप्त कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी कळमना मार्गावरील मरारटोली येरखेडा परिसरातील लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ तमीम फाजील मुक्तार अहमद यांचे कडे तिसऱ्या माळ्यावर घरफोडी करणाऱ्या चार आरोपीस नवीन कामठी पोलिसांनी अटक केली असून तीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली असून यातील पाचवा मास्टर माईंड आरोपी मो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com