– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 8 :- रेती घाटाच्या लिलावाअभावी तालुक्यात अवैधरित्या चोरट्या मार्गाने अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या माहिती वरून या वाळू चोरट्यावर महसूल प्रशासनाचा वचक बसावा व या वाळू चोरीला आळा बसावा यासाठी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी महसूल पथक उभारले असून हे महसूल पथक या वाळू चोरट्यावर आळा बसावा यासाठी कंबर कसून बसले आहेत यानुसार काल रात्री गस्तीवर असलेल्या महसूल पथकाला कामठी तालुक्यातील सुरादेवी येथे एक ट्रक अवैध वाळू वाहतुक करोत असल्याची मिळालेल्या गुप्त माहिती वरून सदर ट्रक क्र एम एच 40 बी एल 0402 च्या चालकाला सदर वाळू वाहतुकी बाबत विचारपूस केले असता ट्रक चालकाने समाधानकारक उत्तर दिले नाही तसेच ही वाळू वाहतूक विना परवाना वाहून नेत असल्याचे निदर्शनास येताच सदर ट्रक ताब्यात घेत ट्रक मधील 7 ब्रास अवैध वाळू जप्त करीत पुढील कारवाहिस्त्व ट्रक कोराडी पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.
ही यशस्वी कारवाहो तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार बमनोटे, मंडळ अधिकारो महेश कुलदिवार, तलाठी वड्डे, सहजे, घाटबांधे, कापगते तसेच वाहनचालक युवराज चौधरी यांनी केली