सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 67 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (14) रोजी शोध पथकाने 67 प्रकरणांची नोंद करून 39100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10000 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 2400 रुपयांची वसुली करण्यात आली.मॉल, उपहारगृहे, लाजिंग बोर्डीगचे हॉटेल,सिनेमाहॉल मंगल कार्यालय असा सस्थांनी रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 15000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून रु 3000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुर नदीवरील पुलासाठी उपसरपंचांची धडपड

Thu Jun 15 , 2023
– नदीमध्ये पाणी असल्यावर शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना मारावा लागतो तीन किलोमीटरचा फेरा – अधिकारी मंत्र्यांना निवेदने परंतु सर्व विफल रामटेक :-तालुक्यातील गट ग्रामपंचायत किरणापूर (वडेगाव) अंतर्गत येत असलेल्या तथा रामटेक व मौदा तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या चोखाळा येथुन सुर नदी गेलेली आहे. मात्र या नदीला पावसाळ्यामध्ये पाणी असल्यावर नदीपलीकडून गेलेल्या रस्त्यावर विद्यार्थ्यांसह विशेषता शेतकऱ्यांना जाता येत नाही त्यामुळे त्यांना जवळपास तीन किलोमीटरचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!