सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 67 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (8) रोजी शोध पथकाने 67 प्रकरणांची नोंद करून 44600 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 6000 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रु 1600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामांकरीता बंद करणेबाबत एकूण 10 प्रकरणांची नोंद करून रु 19500 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून रु 10,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शोषित आणि पीडित व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याची आवश्यकता : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Tue May 9 , 2023
मुंबई :- शोषित आणि पीडित व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. सूर्योदय प्रतिष्ठानतर्फे आयोजित गिफ्टिंग ऑफ साऊंड या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आज मुंबईत कर्णबधीर व्यक्तींना श्रवणयंत्र देण्याचा उपक्रम झाला, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com