सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 63 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (28) रोजी शोध पथकाने 63 प्रकरणांची नोंद करून 29,600/- रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400/-रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 2,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 2,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 9,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. 

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. लीला हाईट्स तसेच मे. गुरूकृपा अपार्टमेंट यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- असे एकुण रु. 10,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत मे. कॅफे कॉफी डे यांनी बीनकामाचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला.तसेच मे. स्वस्तीक डेव्हलपर्स यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. तसेच मे. वेटरनरी कॉलेज यांनी माती रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे.मल्लीका एक्झीबीशन यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. बप्पा मेडीकोझ यांनी बीनकामाचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन मे. बारापात्रे किराणा स्टोर्स तसेच मे.संदीप पत्तल स्टोर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. 5,000/- असे एकुण 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू. 50,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यात आज 62 उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज

Tue Oct 29 , 2024
यवतमाळ, दि.28 :- जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, आर्णी, पुसद, उमरखेड, राळेगाव, दिग्रस या विधानसभा मतदारसंघात आज एकून 62 उमेदवारांकडून नामांकन अर्ज दाखल झाले. आज सर्वाधिक 16 नामांकन एकट्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात दाखल करण्यात आले. आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये यवतमाळ विधानसभा मतदारसंघात एकून १६ नामांकन अर्ज दाखल झाले. त्यात अनिल शंकरराव मांगुळकर (इंडियन नँशनल काँग्रेस), संदीप रमेशचंद्र बाजोरीया (राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!