नमो महारोजगार मेळाव्यात 5 हजार 46 तरुणांना मिळाली नोकरी

– आयटी कंपनीत मिळाली सर्वाधिक वार्षिक 10 लाख रुपये पगाराची नोकरी 

नागपूर :- राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात पहिल्या दिवशी एकूण 16 हजार 300 तरुणांनी उपस्थिती दर्शविली. 459 कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. यावेळी 13 हजार 511 मुलाखती घेण्यात आल्या. यातील 5 हजार 46 तरुणांना नोकरी देण्यात आली.

या मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांमध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील तरुण होते. यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांची संख्याही मोठी होती. या मेळाव्यातून हजारो तरुणांना नोकरी मिळण्याची अपेक्षा आहे.

मेळाव्यात सर्वाधिक पॅकेजची नोकरी एका तरुणाला मिळाली. या तरुणाला एका आयटी कंपनीत वार्षिक 10 लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली.

या मेळाव्याचे आयोजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केले आहे. या मेळाव्याद्वारे उद्या रविवारी देखील मुलाखती होणार असून, बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळण्यास मदत होणार आहे. या मेळाव्यामध्ये 60 हजारावर तरुणांनी ऑनलाइन नोंदणी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टाकी स्वच्छता - धंतोली झोनमधील पाणीपुरवठा बाधित राहणार...

Mon Dec 11 , 2023
#बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही… नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर नागपूरच्या रहिवाशांना उच्च दर्जाचे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याच्या समर्पित प्रयत्नात, नागपूर महानगरपालिका-ऑरेंज सिटी वॉटर (NMC-OCW) ने धंतोली झोनमधील हनुमान नगर, रेशीमबाग आणि वंजारी नगर ईएसआर स्वच्छतेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टाकी साफ करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, खालील भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईलः (A) मंगळवार, 12 डिसेंबर 2023: हनुमान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com