चोरीचे गुन्हे करणारी टोळी गजाआड ५ आरोपी अटकेत एकूण ५५,६००/- रू चा मुद्देमाल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची कारवाई

नागपूर :-दिनांक ०३/०२/२४ रोजी पोस्टे कोंढाळी अप क ६७/२४ कलम ३७९ भादवि चे गुन्हयात आरोपी यांचा शोध घेत असता गोपनिय माहीती मिळाली कि, दोडकी येथे राहणारा गौरव पंचभाइ हा त्याचे काही साथीदारासह कोंढाळी हद्दीत बॅटरी व विहीरीतील पाण्यातील मोटर चोरीच्या घटना करीत आहे. या खबरेच्या आधारे स्टाफसह दोडकी येथे राहणारा गौरव पंचभाई याचे घरी जावुन त्याला ताब्यात घेवुन सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा हा त्याने व त्याचे साथीदाराने चोरीचे गुन्हे केले आहे. त्यावरून दोडकी गावातील त्याचे इतर साथीदार नामे १. पवन तांदळे २. सतीश कंगाली ३. विनोद कंगाली व इतर गुन्हे यांचे सोबत करून गुन्हयातील माल सायखोड कोंढाळी येथे राहणारा समीर शेख नुरु शेख यास सायखोड कोंढाळी येथुन ताब्यात घेवुन त्याचे जवळून गुन्हयातील सदर माल जप्त करून गुन्हे उघडकीस आणले. सदर गुन्हयातील आरोपी नामे-गौरव सुनिल पंचभाई वय २५ वर्ष रा २. पवन जानवाजी तांदळे वय ३६ वर्ष ३. विनोद रामाजी कंगाली वय ४० वर्ष ४. सतीश सुरेश कंगाली वय ३१ वर्ष सर्व रा दोडकी तह काटोल जि नागपूर ५. समीर शेख नुरू शेख वय ४० वर्ष रा सायखोड कोंढाळी तह काटोल जि नागपूर यांचे ताब्यातुन ४ नग एक्साईड कपनीच्या बॅट-या व अंदाजन ८ किलो तांबा तार कि ३६,६००/- चा माल व नगदी १९ हजार रू असा एकुण ५५,६००/-रू वा मुद्देमाल जप्त करण्यात आला, सदर आरोपी यांनी पोलीस स्टेशन कोंढाळी येथे १० गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, नागपूर ग्रामीण यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मागदर्शना खाली सपोनि आशिषसिंह ठाकुर, सफौ उपनिरीक्षक चंद्रशेखर घडेकर, पो हवा प्रमोद तभाने, रणजित जाधव, चालक आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैधरित्या रेती चोरी करणा-या आरोपीविरूध्द कारवाई २० ब्रास रेतीसह एकुण ६१,००,०००/- रू चा मुद्देमाल जप्त

Mon Feb 5 , 2024
नागपूर :- दिनांक ०४.०२.२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक ठमके नेमणुक पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हे पोस्टे बेला हद्दीत अवैध धंद्यावर कार्यवाही करणे कामी पोस्टे बेला परीसरात पेट्रोलिंग करीता फिरत असतांना विश्वसनीय मुखबीरद्वारे खबर मिळाली कि मौजा नांद ते सिर्सी गावाकडे बिना परवाना रेतीने भरलेले १२ चक्का टिप्पर क एम एच ४० सीडी ९६३३ येत आहे. अश्या खबरेवरून रेतीचे अवैध वाहतुक संबंधाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com