संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कन्हान शहरात चोरीच्या घटनेत दिवसेदिवस वाढ.
कन्हान :- येथील तारसा रोड वरील इंदिरा नगर चे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएम च्या सीसीटीव्ही कँमरे वर काळा पेंट स्प्रे करून दोन्ही बँकेचे एटीएम गँस कटर ने कापुन दोन्ही एटीएम मधिल पाच लाख साठ हजार शंभर रूपयाची चोरी करून अज्ञात चोर पसार झाले.
सोमवार (दि.२२) जुलै च्या मध्यरात्री म्हणजे मंगळवार (दि.२३) जुला च्या पहाटे २ ते ४ वाजता दरम्यान चार चाकी वाहनाने आलेल्या अज्ञात चोरानी तारसा रोड कन्हान येथील इंदिरा नगर चे आयसीआय सीआय बँकेचे एटीएम आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएम च्या सीसीटीव्ही कँमरे वर काळा पेंट स्प्रे करून एटीएम मध्ये प्रवेश करून दोन्ही बँकेचे एटीएम गँस कटर ने कापुन इंदिरा नगर च्या आयसी आयसीआय बँकेचे एटीएम मधुन १,०३,००० रूपये आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएम मधिल दोन्ही एटीएम मधिल ४,५७,१०० रूपये असे दोन्ही एटीएम मधिल ५,६०,१०० रूपयाची चोरी करून पसार झाले.
घटनास्थळी कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील आपल्या सहकार्यासह पोहचुन फॉरेक्सी न लँब पथकाला बोलावुन तपास करित फिर्यादी जागेश्वर कुष्णराव पौनीकर वय ३९ वर्ष राह. मालाधरे विहार जवळ पंडितपुरा, जुनी मंगळवारी रोड, नागपुर चैनल एक्जीक्यूटिव (हिताजी पेमेंट सर्विसेस) यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी थानेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.