संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– युवानेते आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त कामठी येथे रक्तदान शिबीर संपन्न.
कामठी :- युवासेनेचे वतीने युवानेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर,नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.कामठी मोटारस्टॅंड चौकालगत असलेल्या युवासेना कार्यालयाचे परिसरात संपन्न झालेल्या या उपक्रमात कामठी येथील नागरिकांनी, युवकांनी, मोठ्या संख्येने उपस्थित होवून या शिबिराचा लाभ घेतला.तर ४२ युवा रक्तदात्यांनी या वेळेस या रखरखत्या ऊन्हाची पर्वा न करता स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले,रक्तदात्यांना हेल्मेट भेट देऊन स्वागत करण्यात आले.आरोग्य तपासणी करणाऱ्यांना औषधे वाटप,व नेत्र तपासणी तील गरजुंना चष्मे देण्यांत आलें. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून व जिल्हा संघटक ग्रामीण चे राधेश्याम हटवार, जिल्हा युवासेनाप्रमुख प्रितम कापसे, तालुका प्रमुख कुणाल चिकटे, कामठी युवासेना प्रमुख अल्पेश पाटील, कामगार सेनेचे ता.प्रमुख मनोहर अगुटले यांच्या संयुक्त हस्ते केक कापून करण्यात आले.
हा उपक्रम अमन ब्लड बॅंक,व राधाकृष्ण हाॅस्पिटल नागपूर यांचे सहकार्याने झालेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या रक्तदान दात्यांना पुर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, कामठी शहरप्रमुख मुकेश यादव, तालुका संघटक पंकज सोर, सुधीर धुरीया यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजक युवा सेनेचे प्रमुख अल्पेश पाटील यांच्यासह विकास मेश्राम,शशीकांत खोब्रागडे,सुरेश बांगर, प्रविण बेलेकर,साहिल रहाटे,विपीन गजभीये,आशिष सोमकुवंर, उमेश भोकरे,आर्यन खोब्रागडे,केतन शेंडे कुणाल हलमारे, सुरज दास,रोशन यादव, धनराज तडसे, गणेश मोहरा,अनील गावंडे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.