नागपूर :- फिर्यादी मोनीका रंजीत राठोड वय ३९ वर्षे, रा. पापुलर हाऊसिंग सोसायटी, मनीष नगर, नागपुर या नागपुर प्रादेशिक कार्यालय येथे वायुवेग वाहन पथक मध्ये कार्यरत असुन त्यांनी पिवळ्या रंगाची टाटा कंपनीची स्कुलबस क. एम.एच.४९/जे. ०७५६ किंमती अंदाजे ४,००,०००/-रू ही कार्यवाही दरम्यान जप्त करून ती प्रादेशिक परीवहन कार्यालय, नागपुर शहर कार्यालयाचे परीसरात ठेवली असता, दिनांक ०८.०९.२०२२ चे १४. १४ वा. ते दि. १५.०५.२०२३ मे १८.०० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हेशाखेचे वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयाचे समांतर तपासात गुप्तबातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, तसेच तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी नामे यशवंत खुशाल वाडकर, वय ३१ वर्षे, रा. बिनाकी मंगळवारी यशोधरा नगर, नागपुर यास ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यासंबंधी त्यास विचारपुस केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याचे सांगीतल्याने त्याचे कडुन सदर गुन्हयात चोरी गेलेले वाहन जप्त करण्यात आले.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, मा.पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन सहा. पोलीस आयुक्त मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अनिल इंगोल बलराम झाडोकर, पोहवा. दिपक रिठे, नापोअं विलास कोकाटे, पंकज हेडाऊ, कपीलकुमार तांडेकर, अभय होणे यांनी केली.