सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 40 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता. 12) रोजी उपद्रव शोध पथकाने 40प्रकरणांची नोंद करून 21 हजार 4०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १4 प्रकरणांची नोंद करून 5 हजार 6०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०2 प्रकरणांची नोंद करून 2०० रुपयांची वसुली करण्यात आली.

दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास १0 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून 07 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अशा एकूण 40 प्रकरणांची नोंद करून 21 हजार 400 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

मनपा धोरणानुसार दंडात्मक कार्यवाही अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून 40 हजार रुपयाचा दंड वसूल केला. रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविण्यासाठी विद्या नगर काटोल रोड येथुन 10000@& दंड वसुल केला. तसेच इतर कार्रवाई मधुन 30000/- रुपयांची वसुली करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सामाजिक सलोखा कायम ठेवा - एसीपी विशाल क्षीरसागर

Sat Apr 13 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – 14 एप्रिल निमित्त शांतता समितीची बैठक कामठी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वा जयंती सोहळा उत्साहात साजरी होत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे तसेच लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही ही दक्षता घेण्याच्या उद्देशाने पोलीस विभागाच्या वतीने काल 12 एप्रिल ला जयस्तंभ चौक स्थित संत कबीर वाचनालयात एसीपी विशाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!