पणजी :-महाराष्ट्राच्या रणजित चव्हाणने वेटलिफ्टिंगमधील पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात रुपेरी कामगिरी केली. त्याने स्नॅचमध्ये १२१ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १६० किलो असे एकूण २८१ किलो वजन उचलले. तामिळनाडूच्या एन अजितने सुवर्णपदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये १३० किलो तर क्लीन व जर्कमध्ये १६० किलो असे एकूण २९० किलो वजन उचलले. आंध्र प्रदेशचा खेळाडू जे कोटेश्वर राव कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने स्नॅचमध्ये १२५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १५४ किलो असे एकूण २७९ किलो वजन उचलले.
काल महाराष्ट्राच्या दिपाली गुरसाळेने महिलांच्या ४५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते तर मुकुंद आहेरने पुरुषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले होते.