– ओबीसी महिलांचा हुंकांर
– ओबीसी महिलांच्या समस्या सोडविणार नागपूरातील महिला ओबीसी महासंघ – सुषमा भड
नागपूर :- ओबीसी महिलांना रुढी परंपरेतून मुक्त करीत संविधानिक हक्काविषयी महिलांना जागृत करण्यासाठी येत्या रविवारपासून ओबीसी महिलांचे दुसरे अधिवेशन भाई बर्धन ऑडीटोरीयम तिसरा मजला परवाना भवन किंग्सवे रुग्णालयाच्या मागे सीताबर्डी रेल्वे स्टेशन येथे सकाळी १०वाजता आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रपरिषदेत राष्ट्रीय महिला ओबीस समाजाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. रेखा बारहाते यांनी दिली. इतर मागासवर्गीय समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर येथील आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
हे अधिवेशन दोन सत्रामध्ये होणार असून यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये महिलांचे प्रबोधन करण्यासाठी अॅड ज्योती ढाकणे या सुदृड ओबीसी समाज घडविण्यासाठी महिलांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. जेष्ठ साहित्यिक संध्या सराडकर या ओबीसी सामाजाचे अस्तित्व व मंडल आयोगाचे भरीव काम या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच डॉ. अपर्णा पाटील या ओबीसी महिलांचे सामाजिक व राजकीय अस्तित्व, अॅड जयश्री शेळके या ओबीसी समाजातील महिला समोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
अधिवेशनामध्ये रविंद्र टोंगे, विजय बल्की, प्रेमानंद जोगी,यांनी समाजासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुषमा भड, कार्याध्यक्षा डॉ शरयु तायवाडे, सचिव अॅड समिक्षा गणेश कल्पना मानकर, विदर्भ प्रदेशाध्यक्ष विजया धोटे,शहराध्यक्ष वृंदा ठाकरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.