मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ‘MMRDA’ची 2700 कोटींची टेंडर

मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर आणि परिसराची वाहतूक वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) विविध टेंडर बुधवारी प्रसिद्ध केली आहेत. याअंतर्गत वसई खाडीवर तीन नव्या पुलांची उभारणी, शिळफाटा-माणकोली, कल्याण आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील खाडीवरील पुलाचे रुंदीकरण ही कामे करण्यात येणार आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी सुमारे २ हजार ७६३ कोटींचा खर्च होणार आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. आता ठाणे आणि भिवंडी शहरांना जोडण्यासाठी वसई खाडीवर तीन नव्या पुलांची उभारणी केली जाणार आहे. यात गायमुख ते पाये गाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर या मार्गाचा समावेश आहे. या तीनही पुलांसाठी एकत्रितपणे १ हजार १६२ कोटी रुपयांचे टेंडर जाहीर करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला ठाणे ते भिवंडी हा प्रवास करण्यासाठी आग्रा महामार्गाद्वारे कशेळी, काल्हेर आणि अंजूर फाटा असा प्रवास करावा लागतो. यावरून मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. त्यामुळे हे नवे पूल वाहतुकीसाठी वेळेची आणि इंधनाची बचत करणारे ठरतील.

ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिळफाटा ते माणकोली या मार्गासाठी ६१४ कोटींचे टेंडर, गांधारी पुलाच्या रुंदीकरणासाठी १४८ कोटी ६२ लाखांचे टेंडर आणि वसई ते पालघर जोडण्यासाठी नारिंगी खाडी येथे मार्बल पाडा जेट्टी ते दातिवरे जेट्टी आणि पालघर ते वैतरणा नदीवर पूल उभारणीसाठी ७४१ कोटींचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. औद्योगिक वसाहत आणि नामांकित कंपन्यांच्या कार्यालयांमुळे वर्दळीच्या असलेल्या वागळे इस्टेट भागातील स.गो. बर्वे मार्गावर वाहतूक कोंडी होते, येथे उड्डाणपूल उभारणीसाठी ९८ कोटींचे टेंडर जाहीर करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लंबी बीमारी से ग्रसित रेल कर्मचारी अपने आश्रित को दे सकते हैं नौकरी

Sat Dec 24 , 2022
– बीमारी के कारण लंबे समय से अपनी ड्यूटी से अनुपस्थित हो रहे हैं। ऐसे कर्मचारी अब अपने बेटा-बेटी या अन्य आश्रित को अपनी नौकरी दे सकते हैं। नागपुर – रेलवे के कर्मचारी जो लंबी बीमारी से ग्रसित हैं, वे अब अपने आश्रित को अपनी नौकरी दे सकते हैं, बशर्ते उनका सेवाकाल पांच वर्ष से अधिक बचा हो। रेलवे बोर्ड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com