नागपूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी रोजी राज्यासह देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. नागरिकांमध्ये मतदान नोंदणी तसेच मतदानाच्या महत्त्वासंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाचा नागपूर जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम 25 जानेवारीला दुपारी 2 ते 3 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नायब तहसिलदार, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदार नोंदणी अधिकारी व ऑपरेटर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.