बोरियापुरा जलवाहिनी आंतरजोडणी करिता जुलै १८ ला २४ तास शटडाऊन   

–  बोरियापुरा मुख्य जलवाहिनी , बोरियापुरा जलकुंभ  आणि वाहन ठिकाणं  जलकुंभाचा पाणीपुरवठा राहणार बाधित

– टँकरद्वारे पाणीपुरवठा देखील राहणार बंद…

नागपूर :- MRIDC  ह्यांनी कडबी चौक ते गुप्ता आटा चक्की, मोमीनपुरा पर्यंत रेल्वे ओव्हरब्रीज बांधणार आहे . त्या करीता त्यांनी सध्या कार्यरत असलेल्या ६०० मी मी व्यासाच्या बोरियापुरा जलवाहिनीला रिप्लेसमेंट म्हणून ६०० मी मी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकली आहे . नागपूर महानगरपालिका येत्या १८ तारखेला, मंगळवारी  ह्या नवीन जलवाहिनीला रिसालदार आखाडा, मोमीनपुरा येथे आंतरजोडणी करण्याकरिता २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

६०० मी मी x ६०० मी मी व्यासाच्या ह्या आंतरजोडणी करीता २४ तासांचा (१८ जुलै (मंगळवारी) सकाळी १० ते १९ जुलै  (बुधवारी) सकाळी १०) पर्यंत चा तांत्रिक  शटडाऊन  अपेक्षित आहे .

ह्या  शटडाऊनमुळे  सतरंजीपूरा झोन मधील पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :

बोरियापूरा मुख्य जलवाहिनी : पंजाबी लाइन  गुरुद्वारा , मोतीबाग  रेल्वे  क्वार्टर्स , मेयो हॉस्पिटल , सैफी नगर , अन्सार नगर, डॉबी नगर, मोमीनपुरा  कब्रस्तान रोड , भानखेडा , दादरापुल  टिमकी , चिमाबाई पेठ , टिमकी  रंभाजी  रोड, गोळीबार चौक, कुराडकर मोहल्ला, संपाटे  मोहल्ला, दंडारे मोहल्ला , पाचपावली , शोभा खेत , बारसे नगर , ठक्करग्राम, नांदगिरी रोड , कुंभारपूरा , पिली मारबत , बंगाली पांजा , मस्कासाथ , परवारपूरा , अंनाज बाजार पोलीस चोकी , इतवारी , तेलीपुरा , मिरची बाझार चौक , रेशम ओली , इतवारी रेल्वे स्टेशन , मारवाडी चौक .

बोरियापूरा जलकुंभ : मोमीनपुरा , MLC कॅन्टीन , कमल बाबा दर्गाह , हंसापुरी, बगवाघर चौक , शेख बारी चौक, नालसाब चौक , काला  झंडा  टाकिया , लाल स्कूल , चमाँर गली , गुलाब बाबा  स्कूल, कोसारकर मोहल्ला , नंदबावाजी दोहा , देवघरपुरा , गांजाखेत चौक, बाजीराव गली , मस्कासाथ, तीन नळ चौक, चुना ओळी , खैरीपुरा  भिशीकर मोहल्ला , भाजी मंडी टांगा स्टॅन्ड , समता बुद्ध विहार , लोहा ओळी , बर्तन ओली , लाड पुरा , मसुरकर चौक .

वाहन ठिकाना: लष्करीबाग

मुख्य ग्राहक : मेयो हॉस्पिटल, बेली शॉप SECR , मोतीबाग , इतवारी रेल्वे स्टेशन…

मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत

अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात…

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शनि मंदिर में गूंजा शनिदेव का जयघोष, शनि प्रदोष पर हुआ अभिषेक

Mon Jul 17 , 2023
नागपुर :-शनि प्रदोष के अवसर पर आज लोहापुल, सीताबर्डी के पुरातन जागृत शनि मंदिर में शनिदेव की प्रतिमा का अभिषेक एवं महाआरती गणमान्य नागरिकों की उपस्थिति में की गई।शनि मंदिर शनिदेव के जयघोष से गूंज उठा।शनिदेव का श्रृंगार किया गया। मंदिर में असंख्य भक्तों ने अभिषेक व आरती का लाभ लिया। पंडित ओम शर्मा ने बताया कि सुबह 5 बजे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com