सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 216 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (27) रोजी शोध पथकाने 216 प्रकरणांची नोंद करून 90000 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 6 प्रकरणांची नोंद करून रु 1200 रुपयांचा दंड वसुल केला. सगळयांवर प्रत्येकी रु ४०० प्रमाणे दंड लावण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणा-यांवर 4 प्रकरणांची नोंद करुन रु 2000 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 44 प्रकरणांची नोंद करून 17600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 40 प्रकरणांची नोंद करून 4000 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 6000 दंड वसूल करण्यात आला. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बद करणे (मनपाच्या धोरणानुसार कार्यवाही करणे) या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करुन रु 7000 दंड वसूल करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर 66 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 13200 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. तसेच उपद्रव करणा-या संस्थांकडून 35 प्रकरणांमध्ये 35000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे  पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Fri Oct 28 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.27) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com