आचारसंहितेदरम्यान उत्पादन शुल्ककडून 21.89 लाखाचे अवैध मद्य जप्त

यवतमाळ :- जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध मद्यविक्रीवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 21 लाख 89 हजाराचे अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे.

जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दि. 5 व 6 नोव्हेंबर या दरम्यान झोटींगधारा नाला परिसर मोहदा ता. केळापुर, रोशन धाबा शिंदोळा ता. वणी, मांडवा गावाचे शिवार, नाल्याकाठी ता.झारी जामणी, शास्त्री नगर, वणी, माऊली धाबा मौजा हरसुल ता. दिग्रस, हरु ता. दारव्हा, मौजा मंगरुळ शिवार ता. यवतमाळ, किन्ही ता.जि. यवतमाळ व इतर गावामध्ये एकूण 23 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत 23 वारस गुन्ह्यांसह 25 आरोपीसह 5 वाहनांसह देशी मद्य 133 लिटर, हातभट्टी 610 लिटर, विदेशी मद्य 4 लिटर व सडवा 7 हजार 200 लिटर असा एकुण 7 लाख 74 हजार 205 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे. निवडणुक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असुन अवैध दारु विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.

विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालयांतर्गत दि.15 ऑक्टोबर ते दि.6 नोव्हेंबर या कालावधीत एकुण 127 गुन्हे नोंदवून 126 वारस गुन्ह्यासह 129 आरोपीसह 10 वाहनांसह देशी मद्य 383 लिटर, हातभट्टी 2 हजार 552 लिटर, विदेशी मद्य 14.2 लिटर, ताडी 445 लिटर व सडवा 27 हजार 275 लिटर असा एकून 21 लाख 89 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईमध्ये, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितेश भाऊराव शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एन. सेंगर, पी.एस. बेढारे, जी. एस. वाघ, साहेबराव बोदमवाड यांच्यासह सर्व दुयम्म निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये अवैध मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री यावर नियंत्रण ठेवण्याकरीता 7 पथके तयार करण्यात आलेली असून अवैध मद्य विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास टोल फ्री नंबर १८००८३३३३३ किंवा व्हॉट्सऍप नंबर ८४२२००११३३ किंवा उत्पादन शुल्क कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 07232- 244256 यावर माहिती कळवावी, असे अधीक्षक नितेश शेंडे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तूमान येथे आजपासून दोन दिवसीय मंडई उत्सव

Sat Nov 9 , 2024
कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती ,तारसा -चाचेर जि प क्षेत्र व तारसा प स गणाअंतर्गत येणाऱ्या तूमान येथे मंडई उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी तर्फे दोन दिवसीय मंडई उत्सवाची सुरुवात उद्या शनिवार नऊ नोव्हेंबर लावणी सम्राजिनी नृत्यांगना अंकिता उपाध्याय यांच्या रात्री सात वाजता लावणीच्या कार्यक्रमाने होणार आहे.रविवार दिनांक 10 नोव्हेंबर ला दिवसभर देव्हाडा, तालुका मोहाडी ,जिल्हा भंडारा येथील शाहीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!