1 ते 7 मार्च 2023 जनऔषधी आठवड्याचे आयोजन

6 मार्च रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

भंडारा : आरोग्य ही संपत्ती असून उत्तम आरोग्यासाठी अल्प दरात जेनेरिक मेडिसिन म्हणजे जन औषधी उपलब्ध आहेत.त्या जन औषधींचा प्रचार प्रसार होण्यासाठी व अल्प दरात रुग्णांना ही औषधे उपलब्ध होण्यासाठी जन औषधीचा प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे. या दृष्टीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार दि.1 ते 7 मार्च 2023 दरम्यान जनऔषधी आठवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

औषधांच्या वाढत्या किंमती व असंसर्गजन्य रोग (उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग) अशा रुग्णांना नियमित औषधी घ्यावी लागत असुन गरीब, गरजु रुग्णांना माफक दरात प्रभावी औषधी मिळाल्याने भविष्यात होणारे द्ददयरोग, किडनीचे आजार, पक्षाघात, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक या सारखे आजार टाळता येतील. “अच्छी भी है, सस्ती भी है.” जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, ग्रामीण-उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यामध्ये जनऔषधांची जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य प्रशासनाचे वतीने जनऔषधी बाबत जनजागृती करण्याचे उद्देशाने 1 ते 7 मार्च जनऔषधी जनजागृती आठवड्याचे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन दि.6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पर्यावरणपूरक होली मनाएं, पुलक मंच परिवार की अपील

Mon Mar 6 , 2023
नागपुर :- अखिल भारतीय पुलक मंच परिवार, राष्ट्रीय जैन महिला जागृति मंच शाखा महावीर वार्ड नागपुर द्वारा रविवार की सुबह पं. बच्छराज व्यास चौक पर पर्यावरणपूरक होली मनाने के लिये जनजागरण किया. होली में केमिकलयुक्त रंग, चीनी रंग, तारकोल, वार्निश जैसे रंगों का प्रयोग किया जाता हैं जो त्वचा को नुकसान पहुंचता हैं. जहां हमारे देश, शहर में नागरिकों को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com