– महावितरणच्या प्रगतीसाठी एकसंधपणे काम करण्याचे आवाहन
नागपूर :- महावितरणचा मागिल 19 वर्षांचा प्रवास हा यश आणि आव्हानांनी परिपुर्ण होता, महावितरणची पुढिल वाटचाल अवघड असली तरी अशक्य नाही. थोडे श्रम अधिक केले तर प्रगतीपथावर मार्गक्रमण करणे सहज शक्य होईल. हे करित असतांना अहंकार बाळगू नका, आपसातील वाद-विवाद, हेवे-दावे, मत-भेद, रुसवे-फ़ुगबे बाजूला ठेऊन कंपनीच्या प्रगतीसाठी एकसंघपणे काम करण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले. महावितरणच्या 19 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणाप्रसंगी ते बोलत होते.
ग्राहक सेवा अधिक प्रभावी करणे, बुडीत कर्जाचे प्रमाण कमी करणे, वीज खरेदीवरील खर्च कमी करण्यासोबतच वितरण हानी आणि पारेषण आणि वाणिज्यीक वीज हनी कमी करण्याचे प्रमुख आव्हान आज महावितरणपुढे आहे, त्यासाठी आपल्याला काम करतेवेळी संयम आणि नम्रतेची खरी गरज आहे. पैसे तर सर्वच कमवितात पण मानसं कमविता यायला पाहिजे असे प्रतिपादन देखील प्रादेशिक संचालक यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी याप्रसंगी बोलतांना महावितरणचा मागिल 19 वर्षाचा प्रवास उलघडतांना महावितरण आज 19 वर्षाचे झाले असल्याने आपल्या प्रगल्भतेसोबतच जवाबदारी देखील वाढली आहे. मागिल आर्थिक वर्षात आणि त्यापुर्वी देखील राज्यात नागपूर परिमंडलाने सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. ही कामगिरी टिकवून ठेवण्यासोबतच ती अधिक उंचाविण्याची जवाबदारी आपल्या सर्वांची आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी 2030 पर्यंतच्या कामांची रुपरेषा दिली आहे, त्याअनुषंगाने आपण प्रत्येकाने कार्य करणे आवश्यक आहे. हे सर्व करीत असतांना प्रत्येकाने आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. विविध छंद जोपासा, कलेचा आनंद घ्या स्द्र सांगतांना मुख्य अभियंता यांनी दुस-याच्या आयुष्यातील अडचणी समजून घेतल्यास आप्ले दुःख कमी होईल, असे देखील सांगितले.
यावेळी जेष्ठ कवी, लेखक, अभिनेते आणि नाटककार ॲड. अनंत खेडकर यांनी ‘हास्य धबधबा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करीत उपस्थितांचे मनोरंजन केले तर, महावितरण कर्मचा-यांनी गायन, कविता वाचन आदी कलागुण सादर केले. कार्यक्रमाला महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अधीक्षक अभियंता राजेश नाईक तर सुत्र संचालन अमित पेडेकर यांनी केले.