नागपूर :- आम्ही सर्व 1995 पेन्शन धारक आपणास सांगू इछीतो आम्ही सर्व कामगार संघ व कामगार गेल्या दहा वर्षापासून देश पातळीवर केन्द्र सरकारला विविध प्रकारच्या माध्यमातून नवी दिल्लीतील बोर्ड क्लबवर उपोषण व आंदोलने केली. काही खासदाराच्या माध्यमातून संसदेत आमच्या पेन्शनचा मुद्दा सुध्दा ठेवण्यात आला परंतू संसदेमध्ये सुध्दा या प्रश्नाची दखल घेतली नाही, आज भारत देशात एकुन ६० ते ६५ लाख कामगार, विविध राज्यांतील रोजगार, गेल्या 20 ते 30 वर्षापासून 25 लाख कर्मचारी आहेत. त्यांना फक्त 1000/- रुपयाच्या आत पेंशन मिळते. बाकी लोकांना फक्त 2500/- रुपये मीळतात. आज पर्यंत प्रस्थापीत सरकारने (B.J.P ने) याची दखल घेतली नाही. 2014 पासून B.J.P. केद्रांत सत्तेत आहे. त्यांनी सत्तेत येण्याआधी आम्हा कामगारांना आश्वाशन दिले होते की आम्ही सत्तेत येऊ तेव्हा ३ हजार ते ५०००/-रु. देऊ. आणि या सोबत महागाई भत्ता देऊ त्याकरीता त्यांनी भगतसीह कोशाहारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समीती बनविली होती. त्यामध्ये प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी आणि इतर सभासद होते, परंतु आज 10 वर्षे झाली. परंतु आमच्या पेन्शनमध्ये एक रुपया सुद्धा वाढविला नाही तर आम्ही, ७० ते ७५ वर्षाचे वयोवृद्ध पेन्शनर कसे जगणार ?
महागाई, एवढी वाढली की आम्ही 600 ते 800 रुपयामध्ये औषध घ्यावे की, जगावे ? वयोवृद्ध कामगारांना प्रश्न पडला आहे म्हणून आम्ही सेवानिवृत्त 1995 पेन्शन धारकांनी सर्वानुमते निर्णय घेताला की, 19 एप्रिल ला इंडिया आघाडीच्या उमेदवारांना संपूर्ण पांठिबा देण्याचा ठराव पास केला व निर्णय घेण्यात आला म्हणून १९९५ सेवानिवृत्त PF पेन्शन धारकांचे इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समर्थन जाहिर करित विकास ठाकरे यांच बोधचिन्ह पंजा ! यांनाच विजयी करा ! व यांनाच मतदान करावे असे सुरेश कदम यांनी पत्रकारांना सांगितले. पत्र परिषदेत मंचावरील उपस्थित सुरेश कदम यांच्या नेतृत्वात ही पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी पांडुरंग शेंडे, सिद्धू कोमजवार, विजयराव दुरतकर, राहुल सूर्यवंशी, सुखदेवजी तलमले, प्रकाश चौधरी, रमेश बांते, प्रकाश येरगुंठवार, विठ्ठलराव ठाकरे, सुनील विंनचुरकर, जनार्दन जगताप आणि साहेबराव खडसे यांची उपस्थिती होती.