नागपूर : गरजू बेरोजगार उमेदवारांनी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्री. निकेतन आर्टस कॉमर्स कॉलेज तुळशीबाग रोड, रेशिमबाग येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये 25 विविध औद्योगिक आस्थापना सहभागी होणार असून मॅट्रीक, नॉनमॅट्रीक, आयटीआय प्रमाणपत्रधारक, पॉलीटेक्नीक, पदविकाधारक, अभियांत्रिकी स्नातक, कला, वाणिज्य व विज्ञान पदवीधर, कृषी पदविका/पदवीधर, जीएनएम, एएनएम., बीएससी नर्सींग, कौशल्य प्रमाणपत्र अशा सर्व शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीची संधी प्राप्त होणार आहे.
या मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
रेशिमबाग येथे 18 ला रोजगार मेळावा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com