६,६८,२४९ मालमत्ता कर वसूलीसाठी भूखंडांचा होणार लिलाव
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या कर व कर आकारणी विभाग, संतरजीपूरा झोन अंतर्गत थकीत मालमत्ता कर असणारे १६ खुले भूखंड जप्त करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांच्या आदेशान्वये थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली.
सतरंजीपुरा अंतर्गत वार्ड क्र. ४२ मधील खसरा क्रमांक ८७/१ येथील कळमना बिनाकी मंगळवारी गृहनिर्माण संस्थेच्या १६ भूखंडांवर मालमत्ता कर थकीत होते. नोटीस नंतरही कर भरणा न केल्यामुळे मनपाद्वारे कळमना बिनाकी मंगळवारी गृहनिर्माण संस्थेच्या घर व भूखंड क्र. १७८८/९८, १७८८/१००, १७८८/ ११२, १७८८/११४, १७८८/२२२, १७८८/२२६, १७८८/२३१, १७८८/२३२, १७८८/२३३, १७८८/२३४, १७८८/२३७, १७८८/२४०, १७८८/२४३, १७८८/२४५, १७८८/२४९, १७८८/२५१ वर एकूण ६,६८,२४९ रुपये मालमत्ता कर थकीत आहे. सदर थकीत कर वसुलीसाठी सर्व १६ भूखंडांचा लिलाव करून कारवाई करण्यात येणार आहे.
झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे यांच्या मार्गदर्शनात सहायक अधीक्षक विजय थुल, कर निरीक्षक भैसारे, रामटेके, प्रशांत खडसे, नितीन लिडर यांनी कार्यवाही पूर्णत्वास नेली.