नागपूर :-बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती जी यांचा 15 जानेवारीला वाढदिवस आहे. बसपाच्या वतीने जनकल्याणकारी दिवस म्हणून तो दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी विदर्भ झोन स्तरीय जनकल्याणकारी समारोह नागपूरच्या झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात दु 12 वाजता होईल.
बसपा चे राष्ट्रीय समन्वयक महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी नितीन सिंग, प्रदेश महासचिव व विदर्भ विदर्भ झोन हे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे तसेच प्रदेश सचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे यांच्या दिशा नीर्देशानुसार बसपाच्या नागपुरातील प्रांतीय कार्यालयात आज महाराष्ट्र प्रदेशचे कोषाध्यक्ष गोपाल खंबाळकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या प्रमुख उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात जनकल्याणकारी समारोहाची आखणी करण्यात आली.
जनकल्याणकारी समारोहाला बसपाचे राष्ट्रीय समन्वयक महाराष्ट्र प्रदेश प्रभारी खासदार रामजी गौतम, दुसरे प्रदेश प्रभारी नितीन सिंग, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष परमेश्वर गोणारे, विदर्भ झोन चे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे, पृथ्वीराज शेंडे, प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली.
आज झालेल्या बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, प्रास्ताविक जिल्हा सचिव अभिलेश वाहाने यांनी तर समारोप जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी केला.
गोपाळ खंबाळकर यांची महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी या प्रसंगी त्यांचे गुलदस्ता देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने सुनंदा नितनवरे, कविता लांडगे, वर्षा सहारे, मंदा शेवडे, सदानंद जामगडे, विकास नारायने, राजरत्न कांबळे, जगदीश गजभिये, प्रवीण पाटील, पराग रामटेके, अंकित थुल, ऍड वीरेश वरखडे, शशिकांत मेश्राम, रोहित ईलपाची, गौतम पाटील, जनार्दन मेंढे, सुमित जांभुळकर, रामराव निकाळजे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.