नागपूर :-गुजरातच्या जामनगर येथील ग्रीन झुऑॅलाजीकल रेसक्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरची चमू गोरेवाडयातील १५ वाघांना घेऊन जाण्यासाठी दाखल होण्यासाठी येणार आहे सुत्रांकडून कळले आहे. हे विदर्भातील पर्यटकांवर अन्याय आहे. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे टायगर फोर्स या वाघांना गुजरातला घेवून जाऊ देणार नाही असा इशारा आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिला आहे. मोठ्या वाजवा गाजवाणे गोरेवाडा प्राणी संग्रहालय नागपूरात सुरू करण्यात आले त्याला राज्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला वाघ हा प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण असते विदर्भातल्या वाघाची डरकाळी आम्हचा अन्यायाचा प्रतिक आहे हा अन्याय आम्ही घपवून घेणार नाही असे रोखठोक मत बागडे यांनी व्यक्त केले. यासाठी पर्यटकांना यांच्या विरोधात दंड थोपटले पाहिजे असे नारायण बागडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.
गोरेवाडयातील १५ वाघांना गुजरातला घेवून जावू देणार नाही - बागडे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com