नागपूर :-पो.ठाणे तहसील हद्दीत अग्रसेन चौक, दवाई मॉर्केट बिल्डींग जवळ फिर्यादी सुनिल रघुलाल झारीया वय ४८ वर्ष, रा. ग्रॉम सुनवारा, मोहल्ला टेगरा, जि. शिवनी मध्यप्रदेश, हे सामान खरेदी करण्याकरीता घटनास्थळी आले असता पांढऱ्या रंगाचे अॅक्टीव्हा वरील तिन अनोळखी आरोपींनी फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून रोख ५,०००/- रू. व सॅमसंग कंपनीचा मोबाईल व युनियन बँकेचे एटीएम व पॅन कॉर्ड असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे तहसिल येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३९२, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद होता.
दि. ०९.०७.२०२३ चे २२.०० वा. चे सुमारास वरील गुन्हयाचे तपासात पोलीस ठाणे तहसिल चे अधिकारी व अमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशिर गुप्त बातमीदाराचे माहिती वरून सापळा रचुन आरोपी १) अन्वर अन्सारी वल्द असरार अन्सारी वय २४ वर्ष रा. अन्सार नगर, बड़ा कुआँ जवळ, अतिक अहमद चे घराचे बाजुला, मोमीनपुरा, नागपूर २) राजेश लक्ष्मीनारायण कुशवाह वय – ३४ वर्ष रा. मु. नरसिंहपूर रेल्वे स्टेशन समोर जगदीश वार्ड जि. नरसिंहपूर पो.ठा. नरसिंहपूर (म.प्र) व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास गॉर्ड लाईन, मंदीरा जवळुन ताब्यात घेतले. आरोपींची सखोल विचारपूस केली असता आरोपींनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपी अन्वर अन्सारी चे ताब्यातुन १) नगदी ३२०० रूपये २) एक हिरो कंपनीची ग्रे रंगाची मोपेड गाडी क.. एम.एच ४० ए. एन ४३२१ गाड़ी की. अं.५०,०००/- रु. ०३) रेडमी कंपनिया ८ ए पांढ-या व फिक्कट आकाशी रंगाचा कि ८०००/- रू. ०४) सॅमसंग कंपनिचा ग्रे रंगाचा मोबाईल कि १०००० /- रू. ०५) रेडमी कंपनिचा पांढ-या व मागील बाजुने गोल्डण रंगाचा कि ९०००/- रू ०६) विवो कंपनिचा आकाशी रंगाचा कि १०००० /- रू ०७) ओप्पो कंपनिचा काळया रंगाचा कि १०००० /- रू ०८) विवो कंपनिचा १७२३ काळया रंगाचा कि १०००० /- रू ०९) विवो कंपनिचा गोल्डण रंगाचा कि ८००० /- रू १०) ओप्पो कंपनिचा पिवळया रंगाचा कि १०००० /- रू ११) रेडमी कंपनिया निळया रंगाचा कि ७०००/-रू असा एकुण १३५,२०० रू. चा मुददेमाल तसेच विधीसंघर्षग्रस्त बालक याचे कडुण गुन्हयातील जबरीने हिसकावलेला सॅमसंग कंपनिचा मोबाईल कि.अं. १००००/ रु असा एकुण १,४५,२०० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग), नागपूर शहर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ३, सहा. पोलीस आयुक्त, कोतवाली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. विनोद पाटील, दुपोनि.. विनायक गोल्हे, सपोनि. शशिकांत मुसळे, पोहवा संजय शाहु, संदीप गवळी, नापोअं. अनंत नान्हे, शंभुसिंग किरार, पोअं. पंकज निकम, पंकज बागडे, यशवंत डोंगरे, कुणाल कोरचे, वैभव कुलसंगे, रोहीदास जाधव व महेंद्र सेलोकर यांनी केली.