संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 13 व्या जयंती निमित्त हरदास नगर येथे तिलक बाबू गजभिए मित्र परिवारच्या वतीने 132 किलो चा केक कापून भीम जयंती मिरवणुकीचे स्वागत करीत केक वितरित करण्यात आले. तसेच थंडपेय लस्सी, चॉकलेट तसेच फळ वितरित करून मिरवणुकीत सहभागी उपासक उपसिकांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामटेक लोकसभा चे खासदार कृपाल तूमाने यांच्या हस्ते 132 किलोचा केक कापून केक वितरित करण्यात आले. याप्रसंगी कामठी मौदा विधानसभा आमदार टेकचंद सावरकर , भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल , नगर कांग्रेस कमेटी कार्याअध्यक्ष मोहम्मद आबिद भाई ताजी ,माजी नगर परिषद अध्यक्ष नीरज यादव ,नगर परिषदच्या माजी उपाध्यक्ष शोभा डोंगरे, विनोद वाधवानी,माजी नगरसेवक कपिल गायधने , प्रमेन्द्र यादव , मंगेश यादव,प्रीति कुल्लरकर , एडवोकेट अभय गेडाम, शेरू संगेवार, क्षितिज महल्ले , तिलक बाबू गजभीए मित्र परिवार चे कार्यकर्तागण उपस्थित होते