१२ वी व १०वीची पुरवणी परीक्षा १६ जुलै पासून

नागपूर :-  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) पुरवणी परीक्षा १६ ते ३० जुलै २०२४ दरम्यान तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगष्ट २०२४ कालावधी दरम्यान घेण्यात येणार आहेत. तसेच १२ व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा १६ जुलै ते ३ ऑगष्ट २०२४ दरम्यान पार पडणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्यातील ९ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या १०वी १२वीच्या पुरवणी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. इ. १०वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ ते ३० जुलै दरम्यान तर इ. १२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ ऑगष्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. तसेच इ. १२वी माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ७ व ८ ऑगष्ट रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भात दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ३ जुन २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्यानुसार परिक्षेच्या तारखांची खात्री करुन विद्यार्थ्यांनी परिक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रनेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा अन्य तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेस के शामकुमार बर्वे भारी मतो से विजयी

Wed Jun 5 , 2024
– चौक से निकाली विजयी जल्लोष रॅली  – काँग्रेस ने 10 साल बाद किया कब्जा  – बाहर से उमेदवार लाना पडा भारी – पूर्व मंत्री सुनील केदार ने रश्मी बर्वे के अपमान का बदला ले ही लिया रामटेक :- रामटेक संसदीय सीट से काँग्रेसके प्रत्याशी श्याम कुमार बरवे ने भारी मतो से जीत दर्ज की. रामटेक मे गांधी चौक मे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com