-पहिल्याच दिवशी 40 बालकांना लसीकरण
कामठी ता प्र 24:- राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असला तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन उपाययोजना करणे गरजेचे आहे.चीन व दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट पहावयास मिळत आहे त्यामुळे आपल्या भारत देशातही धोका नाकारता येत नाही म्हणून प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून सुरक्षित राहावे असे आव्हान कामठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी आज कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात 12 ते 12 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ नयना दुफारे, वैद्यकोय अधिकारी डॉ शबनम खानुनी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्य शासनाच्या आदेशान्वये कामठी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग दिले जात आहे.आता 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलीना कोरोना संसर्गापासून सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.यानुसार ग्रामीण रुग्णालयात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.यानुसर आज झालेंल्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी कामठी शहरातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील 40 बालकांना कोविड लस देण्यात आली ज्यामध्ये 21 मुले तर 19 मुलींचा समावेश आहे.तसेच दुसरा टप्पा 28 दिवसांनी देण्यात येणार आहे.
12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com