12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल

• आज 8 उमेदवारांनी भरले अर्ज

गडचिरोली :- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या 12 झाली आहे.

डॉ. नामदेव दसाराम किरसान (इंडियन नॅशनल काँग्रेस), धीरज पुरूषोत्तम शेडमागे (जनसेवा गोंडवाना पार्टी), मिलींद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी), हितेश पांडूरंग मडावी (वंचित बहुजन आघाडी), योगेश नामदेव गोन्नाडे(बहुजन समाज पार्टी), करण सुरेश सयाम (अपक्ष), सुहास उमेश कुमरे (भीमसेना), विलास शामराव कोडापे (अपक्ष) या आठ उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर यापुर्वी अशोक महादेवराव नेते (भारतीय जनता पार्टी), बारीकराव धर्माजी मडावी (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्ष), हरिदास डोमाजी बारेकर (अपक्ष) व विनोद गुरूदास मडावी (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्ष) या चार उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकांमार्फत शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 99 नामनिर्देशन अर्ज खरेदी करण्यात आले होते.

28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रश्मि बर्वे की आड़ में केदार को निपटाने की तैयारी में कांग्रेसी

Thu Mar 28 , 2024
– ऊपरी तौर से जिले के सभी कांग्रेसी,एनसीपी नेता एक मंच पर नागपुर :- जिले में सबसे ज्यादा राजनैतिक रूप से सक्रिय एकमात्र जनप्रतिनिधि सुनील केदार हैं,जो 365 में से 300 दिन जिले की खाक छानता रहता है,वह भी पिछले डेढ़ दशक से.इसे शुद्ध रूप से प्रोफेशन मान कर भिड़ा रहता है,इस बीच अकारण आड़े आने वालों को उनकी उग्रता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com