बुट्टीबोरी :-पोलीस स्टेशन बुट्टीबोरी अंतर्गत दिनांक ३०/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर आळा घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस ठाणे बुटीबोरी हद्दीतील धवडपेठ येथे चारचाकी वाहन संशयितरीत्या येतांना दिसले. सदर वाहन चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थांबण्याचा इशारा केला असता सदर वाहनात आरोपी मारुती ओमनी कार क्र. TN-51/E-5135 चा चालक (फरार) हा आपले वाहन न थांबवता घटनास्थळावरून वाहन सोडुन पळु लागला, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी चालकाचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेवुन जंगली झुडपात पळुन गेला.
घटनास्थळाहुन १) एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये American Club कंपनीचे सिगारेटचे ९४० सिलबंद पॅकेट प्रत्येकी १२०/-रु प्रमाणे एकूण १,१२,८००/-रु २) एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये Gold Flake Premium कंपनीचे सिगारेटचे १२०० सिलबंद पॅकेट प्रत्येकी ९५/-रु प्रमाणे एकूण १,१४,०००/- रु ३) एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये Gold Flake Premium कंपनीचे सिगारेटचे १२०० सिलबंद पॅकेट प्रत्येकी ९५/- प्रमाणे एकूण १,१४,०००/- रु ४) एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये Gold Flake Premium कंपनीचे सिगारेट चे ११५० सिलबंद पॅकेट प्रत्येकी ९५/-रु प्रमाणे एकूण १,०९,२५०/-रु ५) एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये Gold Flake Premium कंपनीचे सिगारेटचे १२०० सिलबंद पॅकेट प्रत्येकी ९५/-रु प्रमाणे एकूण १,१४,०००/-रु. ६) एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये Gold Flake Smart कंपनीचे सिगारेटचे ४७५ सिलबंद पॅकेट प्रत्येकी ९५/- रु प्रमाणे एकूण ४५,१२५/-रु. ७) एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये Gold Flake Premium कंपनीचे सिगारेटचे १२०० सिलवंद पॅकेट प्रत्येकी १५/-रु प्रमाणे एकूण १,१४,०००/- रु ८) एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये Gold Flake Premium कंपनीचे सिगारेटचे १२०० सिलबंद पॅकेट प्रत्येकी ९५/-रु प्रमाणे एकूण १,१४,०००/- रु ९) एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये ब्रिस्टॉल कंपनीचे सिगारेटचे १२०० सिलबंद पॅकेट प्रत्येकी ७०/- प्रमाणे एकूण ८४,०००/- रु १०) मारुती ओमनी कार क्र. TN-51/E-5135 किंमती २,००,०००/-रु असा एकूण ११,२१,१७५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे बुट्टीबोरी येथे कलम ४१ (१) (ड) जा. फौ. अन्वये इस्तागासा दाखल करण्यात आला असून संबंधित कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे बुट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई नागपुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, सहायक फौजदार महेश जाधव, पोलीस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मिलिंद नांदुरकर, मयूर ढेकळे, पोलीस नायक अमृत किनगे, रोहन डाखोरे यांचे पथकाने केली आहे.