रेल्वे स्थानकावर 108.65 किलो गांजा जप्त

– गांधीधाम एक्सप्रेसने आले नागपुरात,ओडिशाच्या तिटलागढहून आणला गांजा, 16 लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक, लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

नागपूर :- आरपीएफ आणि सीआयबीच्या संयुक्त पथकाने गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडील 12 बॅगची श्वानपथकाकडून तपासणी केली असता 16 लाख 29 हजार 750 रुपये किंमतीचा 108.65 किलो गांजा जप्त करण्यात आला. मुद्देमालासह आरोपींना लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक केली आहे. योगेश नर्मदाप्रसाद (29) 29, राजेश यादव (28) दोन्ही रा. सिंहोर, मध्यप्रदेश आणि शिव दुबे (19) रा. ओरई, उत्तर प्रदेश असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली.

आरोपी केवळ अंमलीपदार्थ पोहोचविण्याचे काम करतात. याच कामासाठी त्यांना ओडीशाच्या तिटलागढला पाठविले होते. गांजा भरलेल्या 11 बॅग घेवून तिघेही गांधीधाम एक्सप्रेसने नागपूरसाठी रवाना झाले. नागपूर स्थानकाहून गाडी बदलून त्यांना सिंहोरला जायचे होते. तिघेही नागपूर स्थानकावर उतरले आणि एफओबीने फलाट एकवर आले. सर्व बॅग वेगवेगळ्या लोखंडी खांबा जवळ ठेवल्या. गस्तीवर असलेल्या आरपीएफच्या पथकाने त्यांच्या संशयीत हालचाली टिपल्या. पथकाने आवाज देताच दोन आरोपी पळाले. पथकाने पाठलाग करून दोघांनाही पकडले. बॅगसंदर्भात विचारपूस केली असता गांजा असल्याचे आरोपींनी सांगितले. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने प्रतिक्षालया बाहेर असलेल्या तिसर्‍या साथीदाराचाही शोध घेतला, त्यालाही पकडले.

श्वान पथकाकडून बॅगची तपासणी करून घेतली. घटनास्थळी सर्व बॅगमधील टेप पट्टीने बांधलेले गांजाचे पॅकीटचे वजन केले. बाजारभावानुसार जप्त गांजाची किंमत 16 लाख 29 हजार 750 रुपये आहे. संपूर्ण 180.65 किलो गांजा जप्त करून पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक केली. न्यायालयाने त्यांना 9 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सौर ऊर्जेवर भर दिल्याने महावितरण आव्हानांसाठी सज्ज - लोकेश चंद्र

Fri Jun 7 , 2024
– महावितरणचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुंबई :- महावितरणकडून शेतीसाठी सौर ऊर्जेचा देशात सर्वाधिक वापर करण्यात येणार असून यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा मिळणार असून औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी होईल. स्वस्त सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात मोठी बचत होऊन सर्वच वीज ग्राहकांचे वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल. सौर ऊर्जेचा वापर महावितरण साठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com