सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 102 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (3) रोजी शोध पथकाने 102 प्रकरणांची नोंद करून 50000 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 36 प्रकरणांची नोंद करून 14400 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 2400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामांकरीता बंद करणेबाबत एकूण 11 प्रकरणांची नोंद करून रु 21000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 28 प्रकरणांची नोंद करून रु 5600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून रु 5000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामटेक येथे ग्राम जयंती महोत्सव साजरा

Thu May 4 , 2023
रामटेक :- अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामटेक च्या वतीने स्थानिक न.प.बालोद्यान येथील प्रार्थनाकुंज येथे ग्राम जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील मोठ्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली होती. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात पहिल्या दिवसाच्या पहाटे ‘ तिर्थस्थापना व ध्यान ‘ ने झाली. दुपारच्या सुमारास महिला भजनासोबत ग्रामगिता या ग्रंथावर मोरेश्वर माकडे गुरुजी यांचे प्रबोधन झाले. सायंकाळी पुरषभजनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com