नागपूर :-सायबर पोलीस ठाणे, नागपुर शहर येथे दाखल अप. क. ००७२ / २०२३ कलम ४२० भा.दं.वि. सहकलम ६६ (ड) आय.टी अॅक्ट गुन्हयातील फिर्यादी नामे भारती रा. नागपुर यांना यातील आरोपीतांनी त्यांचे व्हॉटसअॅप मोबाईलवर लिंक पाठवून टास्क दिला व त्यांना प्रोडक्ट लाईक केले तर १०० /- रु. मिळतील अशी माहीती दिली. त्याचे स्कीन शॉट पाठविण्याचे सांगुन बॅकेची माहिती मागुन व नंतर पार्ट टाईम जॉब करीता ऑफर दिली त्यानंतर टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करण्यास सांगुन टास्क दिले. युट्युब चॅनल सब्सक्राईब केल्यास पैसे अकाउंटला येतील असे सांगुन टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास व टास्क देवून पैसे गुंतविण्यास सांगीतले तसेच नफ्याचे आमिश दाखवून वेगवेगळया अकाउंटवर पैसे पाठविण्यास सांगुन १०,००,००० रू. वेगवेगळ्या बँक खात्यावर जमा करुन फसवणुक केला.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपीचे बॅक खात्याची माहीती प्राप्त करुन, आरोपीने त्याच्या वेगवेगळया बँक खात्यात फिर्यादीची रक्कम वळती करुन घेतली असल्याचे सायबर पोलीस पथकाने तांत्रीक विश्लेषणाचे आधारे कौशल्याचा वापर करुन निष्पन्न केले. त्यामध्ये मनीट्रेल, केवायसी व सीडीआर चे सखोल विश्लेषण करून आरोपीचे बँक खाते फिज केले. फिर्यादी यांनी त्यांची फसवणुकीची रक्कम परत मिळण्याकरीता मा. न्यायालयाकडे अर्ज सादर केला. सायबर पोलीस यांनी याबाबत मा. न्यायालयास अहवाल सादर करुन पाठपुरावा केला. त्यामुळे मा. न्यायालयाचे आदेशाने फिर्यादीला त्यांची फसवणुकीची पुर्ण रक्कम तीन महिन्यांचे आत परत मिळाली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे व सायबर यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक,अमित डोळस, पोउपनि केतकी जगताप व मपोना / रेखा यादव यांनी केलेली आहे.